भारत हरित ऊर्जेमध्ये अग्रगण्य देश बनेल: मुकेश अंबानी

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषदेला व्हर्चुअली संबोधित करताना सांगितले की, भारत आणि जग हवामानाच्या आघाडीवर कठीण काळातून जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्यांसमोर, आपल्याकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे वेगाने हरित, स्वच्छ आणि रिनयूएबल ऊर्जा स्वीकारणे. या आपत्तीला संधीमध्ये बदलून, भारताला हरित ऊर्जेमध्ये जागतिक नेता व्हायचे आहे.
     पंतप्रधान मोदींच्या ‘ग्रीन हायड्रोजन मिशन’चा संदर्भ देत अंबानी म्हणाले की, ही एक दुहेरी रणनीती आहे, ज्यामध्ये भारत एकीकडे कच्च्या तेलावर भारताचे अवलंबित्व कमी करेल, तर दुसरीकडे जागतिक पातळीवरील प्रयत्नांचे नेतृत्व करून भारत जागतिक नेता बनेल. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच “आझादी का अमृत महोत्सव” वर मिशन लाँच करून, पंतप्रधानांनी देश आणि जगाला हरित उर्जा स्वीकारण्याचा संदेश दिला आहे. देशाने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली १०० GW अक्षय ऊर्जेचा टप्पा गाठला आहे. आता आम्ही २०२२ पर्यंत १७५ GW च्या लक्ष्याकडे जोरदार वाटचाल करत आहोत.
     भारत हरित ऊर्जेमध्ये जागतिक नेता कसा बनू शकतो याविषयी आपले दृष्टिकोन व्यक्त करताना अंबानी यांनी निदर्शनास आणले की भारतीय उपखंडात मुबलक अक्षय ऊर्जा संसाधने आहेत. येथे सूर्य देव, वरूण देव मुबलक ऊर्जा प्रदान करतात. वर्षात ३०० दिवस सूर्यप्रकाश असतो. देशाच्या केवळ ०.५% जमिनीचा वापर करून १००० GW सौर ऊर्जा सहजपणे निर्माण करता येते. टू-वे ग्रिड, मायक्रो-ग्रिड, उत्तम ऊर्जा स्टोरेज सोल्यूशन्स आणि स्मार्ट मीटर मध्ये गुंतवणूक करून आपण हे सामान्यांपर्यंत पोहोचवू शकतो. भारत सरकार देशात ग्रीन हायड्रोजन इको-सिस्टीम तयार करण्याची योजना आखत आहे, जी गुंतवणूक आकर्षित करेल.
     हरित ऊर्जेसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत अंबानींनी प्रतिनिधींना रिलायन्सच्या नवीन ऊर्जा व्यवसायाचा रोडमॅप सादर केला. त्यांनी माहिती दिली की, आम्ही जामनगरमध्ये धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स ५००० एकरवर विकसित करण्यास सुरुवात केली आहे. ही जगातील सर्वात मोठी एकात्मिक अक्षय ऊर्जा निर्मिती सुविधा असेल. कॉम्प्लेक्समध्ये चार गीगा कारखाने असतील, जे अक्षय ऊर्जेच्या संपूर्ण स्पेक्ट्रमला व्यापतील. पहिला एक एकीकृत सौर फोटोवोल्टिक मॉड्यूल कारखाना असेल. दुसरा प्रगत ऊर्जा साठवण बॅटरी कारखाना असेल. तिसरा हरित हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रोलायझर कारखाना असेल. चौथा हा इंधन सेल कारखाना असेल जो हायड्रोजनचे ऊर्जेत रूपांतर करेल. आम्ही पुढील तीन वर्षात ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करू.
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता ४५०GW पर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यातील, रिलायन्स २०३० पर्यंत किमान १००GW सौर ऊर्जा स्थापित करेल. हरीत हायड्रोजनला सर्वात किफायतशीर इंधन बनवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, सुरुवातीला त्याची किंमत २ डॉलर प्रति किलोपेक्षा कमी करण्यासाठी. अंबानी म्हणाले की, मी तुम्हाला आश्वासन देतो की रिलायन्स हे ध्येय या दशकाच्या समाप्तीपूर्वी साध्य करेल. भारत एका दशकात १ किलो १ डॉलरचे लक्ष्यदेखील साध्य करू शकतो आणि असे करणारा जगातील पहिला देश बनू शकतो.
——————————————————- ReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!