मान्सून पूर्व तयारीसाठी भारतीय तटरक्षक दलाची कोल्हापूर विमानतळाला भेट

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
       पश्चिम विभागातील भारतीय तटरक्षक दल आगामी मान्सूनच्या तयारीसाठी सज्ज आहे. शोध आणि बचाव कार्याची (SAR) पोहोच वाढवण्यासाठी, पश्चिम किनार्‍यावरील विविध हवाई क्षेत्रांशी UDAN योजनेअंतर्गत समन्वय साधणे, जिल्ह्यातील सुविधांचे समन्वय आणि मूल्यांकन करण्यासाठी कोस्ट गार्ड टीमने डॉर्नियरद्वारे कोल्हापूरला विमानतळास भेट दिली.
       याअंतर्गत  विमानतळ संचालक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर विमानतळ, कोल्हापूर विमानतळ टीम आणि भारतीय तटरक्षक दल एअर स्टेशन दमणचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली, यामध्ये त्यांना आढळले की सर्व सेवा/सुविधा म्हणजे ANS, ATM/ATS, रनवे, टॅक्सीवे, ऍप्रॉन, इंधन भरण्याची सुविधा, MET. सुविधा, E&M सेवा आणि इतर सर्व सेवा आगामी पावसाळ्याला तोंड देण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध असल्याचे दिसून आले.
       कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध सेवांबाबत भारतीय तटरक्षक दलाने समाधान व्यक्त केले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित होत असलेले कोल्हापूर विमानतळ आगामी पावसाळ्यात कोणतीही कठीण परिस्थिती हाताळण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे  विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी सांगितले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!