भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर येथे नवीन प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष बी फार्मसी व द्वितीय वर्ष बी फार्मसी या वर्गातील विद्यार्थी व पालक यांना फार्मसी अभ्यासक्रम उच्च शिक्षण तसेच रोजगारांची विविध संधी इत्यादी बाबींची माहिती देण्यासाठी इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. 
     कार्यक्रमाचे उद्घघाटन प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे व निमंत्रित पालक यांचे हस्ते डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजनाने  झाले. सर्वप्रथम नवीन विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य यांनी  भारती विद्यापीठाची माहिती दिली. तसेच गतिमान शिक्षण समाज परिवर्तन ब्रीदवाक्य अनुसरून  कॉलेज फार्मसी अभ्यासक्रमाचे शिक्षण देणेबाबत महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी तीन वर्षापासून सर्व भारतात एकच पद्धतीचे नवीन फार्मसी अभ्यासक्रम परीक्षा पद्धत व त्या संदर्भात असलेले शिवाजी विद्यापीठाचे नियम शिक्षकवर्गाचे महाविद्यालयमधील विद्यार्थी मंडळ योजना, माजी विद्यार्थी संघटना विविध सुविधांची माहिती दिली. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने माहिती देणारी क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व पालकांना आपला परिचय करून दिला. कार्यक्रमाचया शेवटी  विद्यार्थी पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
      कार्यक्रमाचे डॉ. डी. टी. गायकवाड  यांनी सूत्रसंचालन तर प्रा. आर. जे. जरग यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी वर्ग शिक्षक तसेच कार्यालयीन अधीक्षक सचिन पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. एच. एम. कदम मानद संचालक भारती विद्यापीठ पुणे विभागीय कार्यालय सांगली व प्राचार्य एच. एन. मोरे, उपप्राचार्य डॉ. एम.एस. भाटिया, ॲकॅडमीक ईनचार्ज डॉ. ए. ए. हजारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमावेळी डॉ. एन. आर. जाधव, डॉ. सौ. एन. एम. भाटिया, डॉ. अनिल कुमार शिंदे, डॉ. डी. ए. भागवत तसेघ इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *