उद्योगपती संजय घोडावत ‘द बिझनेसमन फिलेंथ्रोपिस्ट ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     प्रसिद्ध उद्योगपती, समाजसेवक व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांना नुकतेच त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ‘द बिझनेसमन फिलेंथ्रोपिस्ट ऑफ द ईयर २०२०-२१’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणारी आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करणारी नामांकित सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था, महासंस्कृतीच्यावतीने त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      कोविड-१९ या साथीच्या काळात त्यांनी केलेल्या प्रशंसनीय समाजकार्यामुळे देशभरातील लाखो लोकांना याचा फायदा झाला, यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
संजय घोडावत हे नेहमीच लोकांच्या कठीण काळात आधारवड बनले आहेत.
     संजय घोडावत फाऊंडेशनने कोरोना काळात पाच लाखाहून अधिक लोकांना मोफत जेवण, तसेच पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायझर्स, जीवनावश्यक वस्तू आणि इतर मदत साहित्य पुरवले आहे. तसेच संजय घोडावत विद्यापीठ कॅम्पसमध्ये उभारलेल्या अत्याधुनिक कोविड केअर सेंटरमधून आजवर २५,००० हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी सुखरूप परतले आहेत. कोरोना काळात फौंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचेदेखील वाटप करण्यात आले याचबरोबर या जागतिक महामारीच्या काळात कोल्हापूरमधील माऊली केअर या संस्थेस आर्थिक चणचणीमुळे दैनंदिन कामकाज व्यवस्थापित करणे कठीण झाले, तेव्हा संजय घोडावत यांच्या पाठिंब्यामुळे या संस्थेस नवजीवन मिळाले आहे.
      फाऊंडेशनने महिला सबलीकरण, शिक्षण, सॅनिटायझेशन आणि स्वच्छता, ग्रामीण विकास, क्रीडा, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन मदत कार्य आणि आरोग्य या क्षेत्रांमध्येही अतुलनीय कार्य केल्याबद्दल समाजात एक वेगळी प्रतिष्ठा मिळविली आहे. संजय घोडावत हे एक यशस्वी उद्योजक असूनदेखील त्यांचा सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याण यांवर त्यांचा दृढविश्वास आहे. आपल्या समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करणे आणि त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!