महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती प्रदर्शन व कार्यशाळा

Spread the love

• राष्ट्रीय विज्ञान मासानिमित्त १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत आयोजन
कोल्हापूर • प्रतिनिधी
      येथील निसर्ग मित्र संस्थेतर्फे “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” व राष्ट्रीय विज्ञान मासानिमित्त संस्थेचे सदस्य पराग केमकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांच्या जीवनकार्यावर आधारित  माहिती प्रदर्शन व विविध विषयांवर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन १६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे.
      घरगुती कचरा व्यवस्थापन, वनस्पतीजन्य रंग निर्मिती, चला सायबर मित्र बनूया, घर तिथे परसबाग शहर तिथे शहरी शेती फुलवूया, सौरऊर्जेचा दैनंदिन जीवनातील वापर, आपत्ती व्यवस्थापन (वणवा व पूर) अशा विविध विषयांवर विज्ञानाधारीत कार्यशाळा घेण्यात येतील. या बरोबरच महाराष्ट्रातील लक्ष्मण किर्लोस्कर, रावबहाद्दूर दाजीराव विचारे, डॉ. कृष्णाबाई केळवकर, शंकर खंडू कुलकर्णी-जतकर, डॉ. सलीम अली, डॉ. विष्णू माधव घाडगे, हरिश्‍चंद्र गोपाळ पाटील, त्र्यंबक शंकर महाबळे, गोविंद पांडुरंग काणे, वसंत शंकर हुजुरबाजार, एकनाथ वसंत चिटणीस, पंडितराव दाजी कुलकर्णी, रवींद्र बाबुराव मिस्त्री, वसंत रणछोड गोवारीकर, सुधा गजानन गांगल, आनंद दिनकर कर्वे, जयंत विष्णू नारळीकर, शिवराम बाबुराव भोजे, रघुनाथ आनंद माशेलकर, अनिल पुरुषोत्तम काकोडकर, शरदिनी अरुण डहाणूकर, विजय पांडुरंग भटकर, आर्यभट अशा  सुमारे २५ शास्त्रज्ञांची ओळख व माहितीचे प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे.
      सदर उपक्रम हे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन वर्गासाठी तसेच महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ व तरुण मंडळांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. तरी कार्यशाळा व प्रदर्शनासाठी लेखी पत्राद्वारे अनिल चौगुले, २८२३/४८ बी वॉर्ड, महालक्ष्मीनगर, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे निसर्ग मित्र संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. 
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!