इन्फोसिस फिनॅकलची बँकांसाठी डिजिटल बँकिंग SaaS सेवा


कोल्हापूर • प्रतिनिधी
     इन्फोसिस फिनॅकल या एजव्हर्व सिस्टम या इन्फोसिसच्या मालकीच्या उपकंपनीचा भाग असलेल्या कंपनीने आपल्या डिजिटल बँकिंग SaaS (सॉफ्टवेअर-अॅज-अ-सर्विस) सेवेची घोषणा केली.
    भारतीय अर्बन को ऑपरेटिव्ह बँकांना (यूसीबीज) आपला व्यवसाय आणि कार्यपद्धतींमध्ये आधुनिकता आणण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सेवेची रचना करण्यात आली आहे. विद्या सहकारी बँक, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बरेली आणि झोरास्ट्रियन को-ऑपरेटिव्ह बँक या भारतातील तीन आघाडीच्या यूसीबीजनी खास यूसीबी विभागासाठी तयार करण्यात आलेल्या या व्यासपीठाचा अवलंबही सुरू केला आहे. सुयोग्य दरातील या SaaS सेवेमुळे या क्षेत्रातील आघाडीच्या सर्व फिनॅकल पर्यायांचा सर्वसमावेशक कार्यात्मक संच उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे Best of Breed Software Solutions (BBSSL) अशा फिनॅकल व्यवसाय भागीदारांच्या मोफत सेवा आणि क्षमताही यात उपलब्ध असल्याने यूसीबीजना खर्च कमी करणे, कार्यात्मक क्षमता वाढवणे आणि जागतिक दर्जाचा ग्राहकानुभव देणे शक्य होते. 
     इन्फोसिस फिनॅकलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विक्री विभागाचे ग्लोबल हेड वेंकटरामण गोसावी म्हणाले, “दोन दशकांहून अधिक काळापासून फिनॅकल भारतातील वित्त संस्थांच्या बदलात्मक प्रवासात त्यांचा बळकट भागीदार राहिला आहे. आजघडीला, ‘न्यू नॉर्मल’ जगात ग्राहकांचे बदलते वर्तन, नवे चपळ स्पर्धक आणि बदलणारे नियम यामुळे यूसीबी परिसंस्थाही नवे रूप धारण करत आहे. नाविन्यतेवर सातत्याने भर देत देशातील यूसीबीजच्या प्रगतीच्या पुढील टप्प्याला आमच्या भागीदारांसोबत आमच्या सहज उपलब्ध SaaS उप्तादनांचे साह्य देताना आम्हाला आनंद होतो आहे. आमच्या बांधिलकीतील या नव्या टप्प्यामुळे यूसीबीजना कित्येक वर्षांपासून मिळवलेला ग्राहकांचा विश्वास यापुढेही कायम ठेवता येईल आणि भविष्यासाठी एक लवचिक संस्था यातून निर्माण करता येईल. ही प्रणाली वापरणाऱ्या पहिल्या काही वापरकर्त्यांचे म्हणजेच विद्या बँक, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बरेली आणि झोरास्ट्रियन को-ऑपरेटिव्ह बँकेचे फिनॅकलच्या साह्याने प्रगती करणाऱ्या यूसीबीज समुहामध्ये मी स्वागत करतो.”
———————————————–

  ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *