पूरबाधीत घरांच्या पंचनाम्याची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून पाहणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरात महापूरामुळे अनेक ठिकाणी पूराचे पाणी आले आहे. यामुळे पूरबाधीत परिसरात मिळकतींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने अशा मिळकतींचा पंचनामा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु  केले आहे. रामानंदनगर पूरबाधीत परिसरात गुरुवारी सुरु असलेल्या पंचनाम्याच्या कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पाहणी केली. यावेळी उपशहर अभियंता एन. एस. पाटील उपस्थित होते.
     यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. यामध्ये २०१९ च्या पंचनाम्याबाबत काही तक्रारी आल्या होत्या. यावेळी पंचनाम्यामध्ये असा प्रकार होऊ नये याची दक्षता घ्या. पंचनामा करताना जिओटॅग फोटो त्यांचे शुटिंग, आवश्यक ती कागदपत्रे जागेवरच घ्यावीत. पंचनामा करताना समक्ष जागेवर खातरजमा करुन माहिती भरावी अशा सुचना केल्या. नागरिकांनीही पंचनाम्याला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्य माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!