काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

Spread the love

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी काळम्मावाडी जलाशयाजवळ सुरू असलेल्या जॅकवेल आणि इंटेक व्हेलच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.
     कोव्हीडच्या संसर्गामुळे या कामाला सुमारे सव्वा वर्ष फटका बसला. आता प्राधान्याने कामे करण्याच्या सूचना केल्या असून ही योजना जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण होईल अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. या पाहणीनंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह या योजनेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या.
     पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी आज काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामाची पाहणी केली.  यावेळी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, प्रकल्प अधिकारी  हर्षजीत घाटगे, सल्लागार अभियंता व्ही. एस. नलावडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
      यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश अबिटकर, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, प्रकल्प अभियंता हर्षजित घाटगे, सल्लागार अभियंता व्ही. एस. नलावडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, रोहित बांदिवडेकर, उपअभियंता भाग्यश्री पाटील, कल्याणी कालेकर, प्रशांत कांबळे, शाखा अभियंता एच. बी. कुंभार, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आदी उपस्थित होते.
———————————————– Attachments area

ReplyForward

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!