कोल्हापूर • प्रतिनिधी
अमृत योजनेअंतर्गत शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. पाईपलाईन टाकून झाल्यानंतर रस्त्याचे रिस्टोलेशनचे काम संबंधीत ठेकेदाराकडून सुरु आहे. या रिस्टोलेशन कामाची महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी पाहणी केली.
हे रिस्टोलेशन संभाजीनगर स्टॅण्ड ते देवकर पाणंद चौक, हॉकी स्टेडियम चौक ते यल्लमा मंदिर रस्ता व जिल्हाधिकारी कार्यालय समोरील मुख्य रस्त्यावर सुरु आहे. या सर्व कामांची प्रशासकांनी पाहणी केली. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी संबंधीत ठेकेदार यांना शहरामध्ये अमृत योजनेअंतर्गत खुदाई केलेल्या रस्त्याच्या रिस्टोलेशनच्या कामाची गती वाढविण्याच्या सुचना दिल्या. कामाची गती वाढविण्यासाठी कामावर मनुष्यबळ वाढवून पावसाळ्यापूर्वी रस्ते रिस्टोलेशनची कामे स्पेसिफिकेशन प्रमाणे व सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे पालन करून तात्काळ पूर्ण करावीत. रस्ते रिस्टोलेशनची कामे करीत असताना, अपघात वगैरे घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत ठेकेदार यांची राहील अशा सुचना दिल्या.
यावेळी अतिरक्ति आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता अजय साळुंखे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता काटकर, उप अभियंता प्रभाकर गायकवाड, शाखा अभियंता पी. डी. माने, भास्कर कुंभार, संजय नागरगोजे, ठेकेदार दास ऑफशोअर इं. प्रा.लि. यांचे प्रतिनिधी प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
———————————-