कोल्हापूर • प्रतिनिधी
जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर मनुष्य यशाच्या शिखरापर्यंत पोहचू शकतो याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे डॉ.पतंगराव कदम. शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉ.कदम यांनी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची दरवाजे खुले केली. थोर शिक्षणतज्ज्ञ, क्रियाशील समाजसुधारक डॉ.पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे व त्यांचे संपूर्ण जीवन हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.
महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या जीवनपटावर तयार केलेल्या भित्तिपत्रकाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या भित्तीपत्रकाचे आयोजन भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.डी.पी.नाडे, वाय.सी.धुळगंड, एन.एन. नाटके व विद्यार्थ्यांनी केले.
या भित्तीपत्रकांमध्ये डॉ. कदम यांचा कुटुंबवत्सलपणा, भारती विद्यापीठाची वाटचाल, राजकीय कारकीर्द, शैक्षणिक व सामाजिक कार्य, व त्यांनी आजवर केलेले उल्लेखनीय कार्य अशा विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यात आला. याप्रसंगी डॉ.कणसे यांनी भौतिकशास्त्र विभागाच्या सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे मनमुराद कौतुक केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.कणसे यांच्यासमवेत प्रा.टी.आर.सावंत, प्रोफेसर डॉ.प्रभा पाटील, डॉ.अमित सुपले, प्रा.अरुण जाधव व इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल भारती विद्यापीठ प्र-कुलगुरू, कार्यवाह व राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती अध्यक्षा विजयमाला कदम, कुलगुरु डाॅ. माणिकराव साळुंखे, विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम. कदम, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी कौतुक केले.
——————————————————-