‘इशारो इशारो मे’ नाटकाचे पश्र्चिम महाराष्ट्रात प्रयोग

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सरगम क्रिएशन्स निर्मित इंटरटेनमेंट प्रस्तुत ‘इशारो इशारो मे’ या दोन अंकी नाटकाचे प्रयोग पश्चिम महाराष्ट्रात होत आहेत. २ एप्रिल रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर, ३ एप्रिल रोजी विष्णुदास भावे नाट्यमंदिर सांगली आणि ४ एप्रिल रोजी शाहू कला मंदिर सातारा येथे सायंकाळी सात वाजता या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
      ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेला अभिनेता सागर कारंडे ‘इशारो इशारो मे’ या नाटकात प्रमुख भूमिका करीत आहेत. ते म्हणाले की, ‘इशारा इशारा मा’ या मूळ गुजराती नाटकाचा हा मराठी आविष्कार आहे. आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा काहीशी वेगळी भूमिका  या नाटकात साकारत आहे. अबोल मनाचा बोलका आविष्कार म्हणजे इशारो इशारो मे असे या नाटकाबद्दल म्हणावे लागेल. नाटकामध्ये विनोद आहे, रोमान्स आहे व भावनेला हात घालणारे प्रसंग आहेत. एक बोलका आणि एक अबोल या दोन जीवांच्या प्रेमाची ही एक गोष्ट आहे. एका व्यक्तीला कोणाचा एक शब्दही ऐकू येत नाही. सारंच डोळ्यांनी समजून घ्यायचं आहे, अशा व्यक्तीचा आवाज सुरू होऊन हे नाटक मनाला हळवं करतं.  मुंबई-पुण्यातील रसिकांच्या पसंतीस उतरलेले हे नाटक आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आत्तापर्यंत या नाटकाचे ३५ प्रयोग झाले आहेत.
     या नाटकाची मूळ संकल्पना व दिग्दर्शन जय कापडिया यांचे आहे. मूळ लेखक प्रयाग दवे असून मराठीमध्ये स्वप्नील जाधव यांनी रूपांतर केले आहे. संगीतकार राहुल रानडे यांनी त्या नाटकाला संगीतबद्ध केले आहे. अजय पुजारे यांनी नेपथ्याची बाजू सांभाळली आहे. अजय कासुर्डे  निर्माता तर ईशा कापडिया, स्वप्निल माने व मंदार काणे सहनिर्माते आहेत. सागर कारंडे यांच्यासोबत उमेश जगताप, संजना हिंदुपूर, शशिकांत गंगावणे, अव्यान मेहता यांच्याही भूमिका यामध्ये आहेत.
      पत्रकार परिषदेला सागर कारंडे, प्रविण भोसले, अजय कासुर्डे, मंदार काणे व महाजन पब्लिसिटीचे गिरीष महाजन आदी उपस्थित हो

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!