गोव्यात आयएसएल स्पर्धेचा थरार !


कोल्हापूर • प्रतिनिधी
    इंडियन सुपर लीग (आयएसएल ) फुटबॉल स्पर्धा २० नोव्हेंबरपासून गोव्यात सुरू होत आहे. गोव्यातील तीन स्टेडियमवर प्रेक्षकांविना हे सामने होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहून सामन्यातील थरार अनुभवायला मिळणार नाही. स्पर्धेत जमशेदपूर एफसी संघाचा सहभाग असून या संघाकडून कोल्हापूरचा अनिकेत जाधव खेळणार आहे.
    स्पर्धेत ११ संघ सहभागी असून एकूण ११५ सामने होतील. त्यापैकी ५५ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात बारा सामने होतील. आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील सामने मडगावमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियम (फातोर्डा), बांबोळीतील जीएमसी अॅथलेटिक स्टेडियम आणि वास्कोतील टिळक मैदान येथे होतील.
        नोव्हेंबर महिन्यात होणारे सामने
    आयएसएल स्पर्धेच्या सातव्या मोसमास दि.२० नोव्हेंबर रोजी प्रारंभ होईल. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर रात्री ७:३० वाजता केरळ ब्लास्टर्स आणि एटीके मोहन बगान संघादरम्यान सलामीचा सामना होईल. दि.२१-नॉर्थईस्ट युनायटेड एफसी विरूद्ध मुंबई सिटी एफसी, दि.२२-एफसी गोवा विरूद्ध बेंगलोर एफसी, दि.२३-ओडिशा एफसी विरूद्ध हैदराबाद एफसी, दि.२४-जमशेदपूर एफसी विरूद्ध चेन्नईन एफसी, दि.२५-एफसी गोवा विरूद्ध मुंबई सिटी एफसी, दि.२६-केरळ ब्लास्टर्स विरूद्ध नॉर्थईस्ट युनायटेड एफसी, दि.२७- एससी ईस्ट बंगाल विरूद्ध एटीके मोहन बगान, दि.२८-बेंगलोर एफसी विरूद्ध हैदराबाद एफसी.(हे सर्व सामने रात्री ७:३० वाजता होतील.),दि.२९-जमशेदपूर एफसी विरूद्ध ओडिशा एफसी – सायंकाळी ५:०० वाजता तर रात्री ७:३० वाजता – चेन्नईन एफसी विरूद्ध केरळ ब्लास्टर्स, दि.३०-एफसी गोवा विरूद्ध नॉर्थईस्ट युनायटेड एफसी – रात्री ७:३० वाजता.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *