इटली फायनलमध्ये : इंग्लंड – डेन्मार्क लढतीकडे सर्वांचे लक्ष


कोल्हापूर • प्रतिनिधी
     युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इटलीने स्पेनला पराभवाचा धक्का देत फायनलमध्ये प्रवेश केला. आता मध्यरात्री होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या इंग्लंड विरुद्ध डेन्मार्क लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातील विजयी संघ आणि इटली यांच्यात विजेतेपदासाठी लढत १२ जुलै रोजी होईल.
     युरोपियन देशात सुरू असलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेत इटली आणि स्पेन संघात चुरशीचा सामना झाला. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला.  इटलीकडून ६० व्या मिनिटाला फेडरिका चीसाने तर स्पेनकडून ८० व्या मिनिटास अल्बीरो मोराटोने गोल केला. पूर्णवेळेत उत्कृष्ट खेळ करून मोराटोने स्पेनला १-१ अशी बरोबरी करून दिली, मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये मोराटोला गोल करण्यात अपयश आले. अखेर पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीने स्पेनचा ४ – २ ने पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *