• डी. बी. टी. स्टार कॉलेज योजनेअंतर्गत ६३ लाखाचे अनुदान
कोल्हापूर • प्रतिनिधी
महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी दिल्ली यांचेमार्फत स्टार कॉलेज ही योजना प्राप्त झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानचा तुरा रोवला गेला. या योजने अंतर्गत महाविद्यालयातील शास्त्र शाखेला ६३ रूपये लाखाचे अनुदान हे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व महाविद्यालयातील भौतिक सुविधा मिळणार आहेत.
या योजनेसाठी महाविद्यालयाने जून महिन्यामध्ये प्रस्ताव सादर केला होता. संपूर्ण भारतातून एकूण ३९ महाविद्यालयांची अंतिम फेरीत निवड झाली होती. त्यानुसार २१ डिसेंबर २०२१ रोजी महाविद्यालयाने १५ नामांकित संशोधन सदस्यांच्या समितीसमोर सादरीकरण केले होते. त्यात जयसिंगपूर कॉलेजला यश मिळाले.
या योजनेसाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. एम. व्ही. काळे, समन्वयक डॉ. एस. आर. साबळे, डॉ. आर. एस. ढब्बे, गणित विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जे. बी. पताडे, डॉ. पी. पी. चिकोडे, डॉ. एस. डी. उमडाळे, प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. आर. पाटील, ऑफिस अधीक्षक एस. डी. मगदूम यांनी परिश्रम घेतले. तसेच स्थानिक समिती जयसिंगपूर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
त्याचप्रमाणे कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेच्याआधारे महाविद्यालयास नॅक, बेंगलोर यांचेकडून नुकतेच A Grade चे मानांकन प्राप्त झाले आहे. महाद्यिालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच स्थानिक समिती, जयसिंगपूर यांचे सहकार्य लाभले.
—————————————————–