4G डाउनलोड स्पीडमध्ये जिओ अव्वल : ट्राय

Spread the love

• जिओचा डाउनलोड स्पीड एअरटेल आणि व्हीपेक्षा जास्त
कोल्हापूर • प्रतिनिधी
     रिलायन्स जिओने एअरटेल आणि व्ही (व्होडाफोन – आयडिया) ला पुन्हा सरासरी 4G डाऊनलोड स्पीडच्या दृष्टीने प्रचंड फरकाने धोबीपछाड दिली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओचा डाऊनलोड वेग जूनमध्ये २१.९ एमबीपीएस मोजला गेला. मागील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात जिओचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड २०.७ एमबीपीएस होता. रिलायन्सचा डाऊनलोडचा वेग मागील अनेक महिन्यांपासून सतत वाढत आहे, असे रिलायन्स जिओने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
     रिलायन्स जिओने 4G डाउनलोड स्पीडमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ट्रायने प्रसिद्ध केलेल्या डेटाप्रमाणे रिलायन्स जिओचा 4G डाउनलोड स्पीड त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा बऱ्याच पटीने जास्त आहे. जूनमध्ये एअरटेलचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड ५.० एमबीपीएस राहिला आहे, जो मेमध्ये ४.७ एमबीपीएस होता. एअरटेलने किरकोळ वाढ नोंदविली असली तरी रिलायन्स जिओच्या डाऊनलोड स्पीडपेक्षा तो चार पट कमी आहे. भारती एअरटेलचा 4G डाउनलोड स्पीड फेब्रुवारी २०२१ च्या तुलनेत सुमारे ३० टक्क्यांनी कमी होऊन तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
     व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलरने त्यांचे व्यवसाय विलीन केले आहेत आणि आता ते व्होडाफोन-आयडिया म्हणून कार्यरत आहेत, परंतु एप्रिल २०२१ पर्यंत ट्राय दोघांचे आकडे स्वतंत्रपणे दाखवायचे. मे महिन्यापासून ट्रायने व्ही इंडियाच्या नावावर दोन्ही कंपन्यांचे डेटा प्रकाशित करण्यास सुरवात केली आहे.
     व्ही इंडियाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की कंपनीने मे महिन्यात सरासरी डाउनलोड वेग ६.३ एमबीपीएस नोंदविला होता, तो जूनमध्ये ६.५ एमबीपीएसपेक्षा जास्त होता. व्ही इंडियाने भारती एअरटेलला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे, परंतु कंपनी रिलायन्स जिओसमोर कुठेही उभी राहत नाही. रिलायन्स जिओच्या डाऊनलोडची गती व्ही इंडियाच्या तुलनेत तीनपट आहे.
      मायस्पीड अप्लिलेशनच्या मदतीने एकत्रित केलेल्या रिअल टाइम डेटाच्या आधारे ट्रायद्वारे सरासरी वेग मोजला जातो.
——————————————————- 

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!