21.9 Mbps च्या 4G डाउनलोड स्पीडसह जिओ अव्वल: ट्राय

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा 4G डाउनलोड स्पीडमध्ये अव्वल असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने ऑक्टोबर महिन्यासाठी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जिओचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 21.9 Mbps इतका मोजला गेला. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 1 एमबीपीएसची वाढ झाली असून सप्टेंबर महिन्यात जिओचा 4G डाउनलोड स्पीड 20.9 Mbps होता.
     टेलिकॉम क्षेत्रातील तीन प्रमुख कंपन्यांचा 4G स्पीड वाढला आहे. आणि प्रत्येकवेळी प्रमाणे, यावेळी देखील रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एअरटेल आणि वी (Vodafone-Idea) ला सरासरी 4G डाउनलोड स्पीडच्या बाबतीत मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. जिओचा 4G डाउनलोड स्पीड एअरटेलपेक्षा 8.7MBPS आणि वी पेक्षा 6.3MBPS जास्त होता. सरासरी 4G डाउनलोड स्पीडमध्ये रिलायन्स जिओ सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे.
      रिलायन्स जिओच्या मागे असलेल्या एअरटेलने 13.2 Mbps 4G डाउनलोड स्पीड नोंदवला. सप्टेंबरच्या तुलनेत त्याच्या वेगात 1.3Mbps ची किंचित वाढ झाली आहे. एवढी वाढ करूनही एअरटेल गेल्या अनेक महिन्यांपासून सलग तिसऱ्या क्रमांकावर आहे.
      व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलरने त्यांचे व्यवसाय विलीन केले आहेत आणि आता ते व्होडाफोन-आयडिया म्हणून काम करत आहेत, परंतु एप्रिल 2021 पर्यंत, ट्राय दोन्हीचे आकडे वेगळे दाखवत असे. मे महिन्यापासून ट्रायने दोन्ही कंपन्यांचा डेटा Vi India या नावाने प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे.
      व्होडाफोन आयडियाकडील डेटा म्हणजेच Vi India दर्शविते की, ऑक्टोबर महिन्यात कंपनीचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 1.2 Mbps ने वाढला आहे. ऑक्टोबरमध्ये, वी इंडियाची सरासरी 4G डाउनलोड गती 15.6 Mbps इतकी मोजली गेली.
      डाउनलोड्सप्रमाणेच सरासरी 4G अपलोड स्पीडमध्ये भारती एअरटेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनीचा सरासरी अपलोड वेग 5.2 एमबीपीएस होता. वी 7.6 Mbps सह सरासरी 4G अपलोड गतीसह चार्टमध्ये अग्रस्थानी आहे. रिलायन्स जिओने 6.4 Mbps च्या अपलोड स्पीडसह दुसरा क्रमांक पटकावला.
       मायस्पीड ॲप्लिकेशनच्या मदतीने गोळा केलेल्या रिअल टाइम डेटाच्या आधारे TRAI द्वारे सरासरी वेग मोजला जातो.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!