कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेत अनुकंपा घ्या ६२ वारसदारांना नोकरीची नियुक्तीपत्रे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आली.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आई-वडील, बहिण-भाऊ यांची सेवा करा. तरच तुम्हांला या अनुकंपाच्या नोकरीचे पुण्य मिळेल. कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यासह देशभरात मिळविलेला लौकिक गौरवास्पद आहे. जिल्हा परिषद बदनाम होणार नाही, अशा पद्धतीने काम करा आणि हे वैभव टिकवून ठेवा.
पालकमंत्री नामदार सतेज पाटील म्हणाले, वृद्ध आई -वडिलांचे विदारक चित्र समाजात दिसत आहे. नोकरी लागल्यानंतर वृद्ध आई -बापाला सांभाळा. एवढीच तुमच्याकडून माफक अपेक्षा.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केली. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मनीषा देसाई यांनी मानले.