कोल्हापूर • प्रतिनिधी
बदलत्या कामाच्या कार्यपद्धतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने कोल्हापूर येथील नामवंत बीपीओ कंपनीमध्ये नोकरीची संधी विद्या प्रबोधिनी कौशल्य विकास रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी २१ ते २९ या वयोगटातील कोणत्याही शाखेतील स्त्री/पुरुष पदवीधर उमेदवार पात्र आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विद्या प्रबोधिनी, शाहूपुरी ४ थी गल्ली, शहाजी लॉ कॉलेजसमोर असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्या प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष राहूल चिकोडे, संचालक नितीन कामत यांनी केले आहे.
२१ वे युग हे संगणक व माहिती तंत्रज्ञान युग म्हणून ओळखले जाते. संगणक तंत्रज्ञानाने व्यक्तीच्या ज्ञानामध्ये आणि कौशल्यामध्ये वाढ आणि सुधारणा होऊन जगाची दारे आता सर्वांसाठी खुली झाली आहेत. सध्या भारत देशात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आपला विस्तार करत असून त्यांना स्थानिक संगणक साक्षर पदवीधारक उमेदवारांची आवश्यकता असते.
आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या प्रबोधिनी संस्था नेहमीच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणेसाठी कार्यरत आहे. कोरोनाच्या संकटामध्ये कामाची पद्धत बदलून सध्या online work / work from home अशी संकल्पना पुढे येत आहे, त्यामुळे अशा रोजगाराच्या संधीला भविष्यात सुरक्षित रोजगाराचे क्षेत्र म्हणून पाहिले जात आहे.
——————————————————- Attachments area