कोल्हापूर • प्रतिनिधी
रायगड कॉलनी-जरगनगर या प्रभागातील ज्योतिर्लिंग कॉलनी – जरगनगर रस्त्यावरील पूलाच्या कामाची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी केली. या पुलाचे काम तात्काळ सुरू करावे, असे आदेश ना.सतेज पाटील यांनी दिले. ना.पाटील आणि आ.ऋतुराज पाटील यांनी नगरोत्थान योजनेतून १ कोटी २० लाख रुपये निधी या कामासाठी उपलब्ध करुन दिला आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ७८ रायगड कॉलनी-जरगनगर या प्रभागातील ज्योतिर्लिंग कॉलनी जरगनगर रस्त्यावरील पूल २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. हा पूल लवकर पुन्हा बांधावा, अशी मागणी या भागातील नागरिकांची होती. त्यानुसार माजी नगरसेविका अश्विनी रामाणे आणि मधुकर रामाणे यांनी या पुलाच्या कामासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार या पुलाच्या कामासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि आ. ऋतुराज पाटील यांनी नागरोत्थान योजनेतून १ कोटी २० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.
आज या पुलाची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले यांच्यासमवेत केली. यावेळी त्यांनी आवश्यक सूचना करून या पुलाचे काम तात्काळ सुरु करावे, अशी सूचना केली.
यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, रामकृष्ण ठाकूर, अशोक कुलकर्णी, सुधीर चरणकर, युवराज गुरव यांच्यासह ज्योतिर्लिंग कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.