कागल विधानसभा मतदारसंघाचा शंभर टक्के विकास करणार: मंत्री हसन मुश्रीफ

•जैन्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकासकामांची उद्घाटने
कोल्हापूर • प्रतिनिधी
     मंत्रिपदाच्या येत्या तीन वर्षाच्या कार्यकाळात कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघाचा शंभर टक्के विकास करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यानंतर मतदारसंघात येत्या पंचवीस वर्षात सांगायलासुद्धा काम शिल्लक असणार नाही, असेही ते  म्हणाले.
     जैन्याळ (ता.कागल) येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसह साडेचार कोटींच्या विकास कामांची उद्घाटने व प्रारंभ  कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सौ. शिल्पाताई शशिकांत खोत होत्या.
     मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या तीस -पस्तीस वर्षांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीत गट-तट, पक्ष कधीच पाहिला नाही. कुठल्या गावाने किती मते दिली, याचा कधीच विचार केला नाही. ग्रामपंचायत उलटी असो वा सुलटी. विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.
     यावेळी येथील कु. सुप्रिया दिनकर  पाटणकर यांनी जर्मन विद्यापीठातून संशोधनातील ‘मास्टर ऑफ सायन्स’ ही पदव्युत्तर पदवी घेतल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
      यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, परशुराम शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील- कुरूकलीकर, कागल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, एम. आर. शेळके, पी. के. पाटील, दिगंबर शेळके, दिनकर पाटणकर, वंदना जाधव, ज्ञानदेव भोंगाळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विशाल शिंदे, शिवाजी शेळके, सर्वजनिक बांधकामचे उप अभियंता डी. व्ही. शिंदे, यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
      स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच संजय बरकाळे यांनी केले. सूत्रसंचालन आर. के. पाटील यांनी केले. आभार अशोक जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *