• कागल शहराच्या विस्तारित क्षेत्राचा सिटीसर्वे प्रारंभ
कोल्हापूर • प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेले कागल शहर सर्वांग सुंदर आहेच. स्वच्छता, विकास आणि सोयी सुविधांच्या बाबतीत ही कागल शहर राज्यासह, देशात नेहमीच नंबर वन असेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल शहराच्या विस्तारित क्षेत्राच्या सिटी सर्वे योजनेचा प्रारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शहरातील आठ ओपन जिमचे लोकार्पण व स्वतःच्या मालकीच्या जागेवर वैयक्तिक नवीन घरकुल बांधकाम करणे, केंद्रशासनाच्या पहिल्या अनुदानाचे वाटप हे कार्यक्रम ही झाले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, वाढत्या शहरीकरणाचा प्रश्न सबंध महाराष्ट्रभर आहेत, परंतु स्वच्छता विकासकामे आणि सोयीसुविधांच्या पुरवठ्यामुळे तो कागलमध्ये सुटलेला दिसतो, ही चांगली गोष्ट आहे.
यावेळी भुमिअभिलेखचे उपसंचालक किशोर तवरेज, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, ॲड. संग्राम गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, प्रांताअधिकारी सुशांत बनसोडे, भूमीअभिलेख पुणे जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, उपाधिक्षक सौ.सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, नगरसेवक सतीश घाडगे, संजय चितारी, सौ. माधुरी मोरबाळे, सौ. पद्मजा भालबर, सौ. शोभा लाड, सौ. जयश्री शेवडे, सौ. नुतन गाडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत पांडुरंग पोटे यांनी केले. प्रास्ताविक नगरपालिकेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार नगरसेविका सौ.मंगल संग्राम गुरव यांनी मानले.
——————————————————-