कागल शंभर टक्के लसीकरणाचा पहिला विधानसभा मतदारसंघ असेल: मंत्री मुश्रीफ

Spread the love

• दानशूर व्यक्ती व संस्थांच्या योगदानातून जनतेला मोफत लस
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कागल शहरासह कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघ हा शंभर टक्के लसीकरण झालेला पहिला मतदार संघ असेल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दानशूर व्यक्ती, संस्था, कंपन्या यांच्या योगदानातून सुरू असलेला कागलचा मोफत लसीकरणाचा उपक्रम महाराष्ट्रासह सबंध देशाला पथदर्शी ठरेल, असेही ते म्हणाले.
     कागल नगरपरिषद व दि फेडरल बँकेच्या संयुक्त योगदानातून शहरातील नागरिकांना मोफत लसीकरणाच्या अभियानाचा प्रारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि फेडरल बँकेचे असिस्टंट मॅनेजर नरहरी कुलकर्णी होते. या उपक्रमांतर्गत शहरातील अठरा वर्षावरील तीन हजार नागरिकांना मोफत लसीकरण केले जाणार आहे.
      यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, ७० टक्के लसीकरण झाल्याशिवाय देश कोरोनामुक्त होणार नाही. लस ही जरी संजीवनी नसली तरी लसीकरणानंतर धोका कमी आहे, एवढे मात्र निश्चित.
      यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, फेडरल बँकेचे असिस्टंट मॅनेजर नरहरी कुलकर्णी यांनी मनोगते व्यक्त केली.
      यावेळी गडहिंग्लजच्या स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. अजित पाटोळे, केडीसीसी बँकेचे संचालक असिफ फरास, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, पी. बी. घाटगे, डॉ. अमर पाटील, प्रकाश नाळे, सुनिल माळी, संजय चितारी, संजय ठाणेकर, मोहन कुंभार, नगरसेवक प्रवीण काळबर, सौरभ पाटील, विवेक लोटे, सौ. नूतन गाडेकर, सतीश घाडगे, सौ. माधवी मोरबाळे, आनंदा पसारे आदी प्रमुख उपस्थित होते.
     स्वागत नगरसेवक प्रविण काळबर यांनी केले. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार नगरसेवक सौरभ पाटील यांनी मानले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!