दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेतून “करण”ला अभिनयाची संधी


कोल्हापूर • प्रतिनिधी
    दख्खनचा राजा जोतिबा मालिकेत नांगनूर येथील महाविद्यालयीन युवक श्रेयस उर्फ करण उत्तम कांबळे याला अभिनयाची संधी मिळाली आहे. तो या मालिकेत एका गावकऱ्याची भूमिका करत आहे.
    स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेला सर्वांनी पसंती दिली आहे. या मालिकेमध्ये नांगनूर तालुका निपाणी येथील एक हरहुन्नरी कलाकार श्रेयस उर्फ करण कांबळे या युवकाला झळकण्याची संधी मिळाली. तो एका गावकऱ्याची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरातील चित्रनगरीत करण कांबळे करत असलेल्या भूमिकेचे चित्रीकरण झाले. करणला अभिनयाच्या क्षेत्रात मिळालेल्या या संधीबद्दल त्याचे नांगनूर परिसरात कौतुक होत आहे.
     दख्खनचा राजा जोतिबा मालिकेत मला अभिनय करण्याची संधी  मिळाली. माझ्याकडे असलेल्या कला गुणांना प्रोत्साहन मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. मला अभिनयाची आवड असून भविष्यात या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे करण कांबळे या नवोदित कलाकाराने सांगितले.
      अर्जुननगर निपाणी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या करणला ढोलकी, हलगी व ऑर्गन अशी  विविध प्रकारची वाद्ये वाजवण्याची कला अवगत आहे. तो कुरली येथील नटराज सोंगी भजनी मंडळात ऑर्गन वाजवतो. कोल्हापूर येथील अंधशाळेत ढोलकी वादक म्हणून काम करतो. तसेच त्याला उत्कृष्ट हलगी वाजवता येते.
    करणला वडील उत्तम कांबळे, चुलते मोहन कांबळे यांच्याबरोबरच सचिन गदगे यांचे मार्गदर्शन लाभले.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *