लेगस्पिनर पठाणच्या ६ बळींमुळे करवीर तालुक्याची विजयी सलामी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     लेगस्पिनर मुस्तकीम पठाणसह श्रेयस पाटील व पार्थ पाटील यांच्या गोलंदाजीपुढे गडहिंग्लज असोसिएशन संघ २५.१ षटकांतच गारद झाल्याने करवीर तालुका संघाने ६४ धावांनी मात करून विजयी सलामी दिली.
      कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि स्व.सौ. मालती शामराव पाटील ट्रस्ट पुरस्कृत १९ वर्षाखालील कै.सौ.मालती पाटील क्रिकेट स्पर्धेला राजाराम कॉलेज कोल्हापूर येथील मैदानावर प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन संजय पाटील यांच्या हस्ते तर सामन्याची नाणेफेक सुमीत पाटील यांच्या हस्ते झाली. यावेळी केडीसीएचे अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, सचिव केदार गयावळ, स्पर्धा कमिटी अध्यक्ष कॄष्णा धोत्रे, जनार्दन यादव, नंदकुमार बामणे, सुरज जाधव, अशोक भापकर, कृष्णा धोत्रे आदींसह पंच व खेळाडू उपस्थित होते. 
      स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना गडहिंग्लज शहर व तालुका क्रिकेट असोसिएशन विरूध्द करवीर तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्यात झाला. प्रथम फलदांजी करताना करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनने ४० षटकांत सर्वबाद १६८ धावा केल्या. यामध्ये नितीश केबानी ५४, वर्चस्व मोरे १९, करण चव्हाण १५ व अनुराग मिस्त्री १५ धावा केल्या. गडहिंग्लज शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनकडून सम्मेद महाजन, वेंदात पाटील, प्रेम चौधरी व भारती जाधव यांनी बळी घेतले आणि ३ खेळाडू धावबाद झाले.
    उत्तरादाखल खेळताना गडहिंग्लज शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनने २५.१ षटकांत सर्वबाद १०४ धावा केल्या. यामध्ये प्रणव पाटील २७, वेंदात पाटील नाबाद २०, शिरीष माळवी १३ धावा केल्या. करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनकडून लेगस्पिनर मुस्तकीम पठाणने ६ बळी घेतले. तसेच श्रेयस पाटील व पार्थ पाटील यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन संघाचा डाव संपुष्टात आणला. अशाप्रकारे करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनने ६४ धावानी  मात करून विजयी सलामी दिली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!