विमानतळ संचालक कटारीया यांचा राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे सत्कार

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारीया यांनी ‘आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक’ ही महत्वपुर्ण पदवी प्राप्त केल्याबद्दल ‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड एज्युकेशन’ व ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशन’ तर्फे त्यांचा ललित गांधी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
    ‘एअरपोर्ट काऊन्सील इन्टरनॅशनल’ कॅनडा ही जगातील विमानतळ व्यवस्थापनासंबंधीचे अभ्यासक्रम व मानक प्रदान करणारी संस्था असुन, या संस्थेचा अभ्यासक्रम पुर्ण करणार्‍यांना IAP  ही पदवी प्रदान केली जाते. भारत सरकारच्या एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडियातर्फे कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कुमार कटारीया यांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती.
    हे प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण करून कटारीया यांनी देशातील निवडक १०० पदवीधारकांमध्ये स्थान मिळविले आहे. त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते कटारिया यांना विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सचिव रणजित पारेख, खजानीस अनिल पिंजाणी, सहसचिव हर्षवर्धन भुर्के, विजय येवले, प्रितेश दोशी, प्रताप पोवार आदि उपस्थित होते.
      कटारीया यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल ललित गांधी यांनी गौरवोद्गार व्यक्त केले व नवीन मिळालेल्या पदवीचा कोल्हापूर विमानतळाचे वेगाने विस्तारीकरण व विकास होण्यास उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
    सत्काराला उत्तर देताना कमलकुमार कटारीया यांनी ‘कोल्हापूर विमानतळ’ देशातील आदर्श विमानतळ बनविण्याचा आपला प्रयत्न राहील असे सांगितले.
…………………………………………..

 Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!