![]() ![]() | |||
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)च्यावतीने नविन हंगामासाठी (२०२०-२१) क्रिकेट संघांनी व खेळाडूंनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणे आवश्यक आहे.
चालूवर्षाकरिता आपल्या संघाचे व खेळाडुंचे नुतनीकरण दि. ५ जानेवारी २०२१पर्यंत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात करावे. संघ व खेळाडूंची नोंदणी असल्याशिवाय कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, यांची नोंद घ्यावी असे संस्थेचे सचिव केदार गयावळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.