केडीसीसी बँकेत संस्थाना दहा टक्केनुसार २५ कोटी डिव्हिडंडचे वाटप

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना २५ कोटी रुपये डिव्हिडंड वाटपचा प्रारंभ झाला. बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक आमदार पी. एन. पाटील व संचालकांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात संस्थांना हे वितरण झाले. बँकेशी संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील एकूण दहा हजार, १८५ संस्थांना दहा टक्केनुसार डिव्हिडंड वाटप झाले.
     याबाबत अधिक माहिती अशी, महिन्यापूर्वी झालेल्या बँकेच्या ८३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरता दहा टक्के लाभांश जाहीर केला होता. त्यानुसार कोल्हापुरात बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला करवीर तालुक्यातील श्री शाहू छत्रपती विकास सेवा संस्था, साबळेवाडी व बलभीम विकास सेवा संस्था, देवाळे व इतर संस्थांचे  पदाधिकारी उपस्थित होते.
     यावेळी बोलताना आमदार पी. एन. पाटील म्हणाले, महिनाभरापूर्वीच बँकेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवाळीपूर्वी सहकारी संस्थांना दहा टक्के डिव्हिडंड देणार असल्याची घोषणा केली होती. त्या शब्दाची ही वचनपूर्ती आहे. शाखा पातळीवर ही रक्कम जमा देण्यात आली आहे.
     यावेळी आमदार राजेश पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, विलासराव गाताडे, अनिल पाटील, सर्जेराव पाटील- पेरीडकर, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, भैय्या माने, असिफ फरास, श्रीमती उदयानीदेवी साळुंखे आदी संचालक उपस्थित होते.          
      यावेळी सी. ए. रावण, विकास जगताप, शिवाजीराव आडनाईक, आर. जे. पाटील, राजू पाटील, शरद बावधनकर आदी अधिकारी तसेच संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
      स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!