केडीसीसी बँकेत मृतांच्या वारसदारांना अनुकंपा नोकरीची नियुक्ती पत्रे व विमा धनादेश वाटप


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (केडीसीसी)च्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा अंतर्गत नोकरीची नियुक्ती पत्रे व विमा धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीमध्ये मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विमा धनादेश व नियुक्ती पत्रांचे वाटप झाले.
      यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महाभयानक महामारीतही केडीसीसी बँकेने ग्राहकांना तत्पर सेवा अखंडपणे दिलेली आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी ग्राहकसेवा केली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी बँक हिमालयासारखी उभी आहे.
       याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास बँकेने २१ लाख रुपये विमासुरक्षा कवच व संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी कल्याण निधीमार्फत दोन लाखाच्या विमा सुरक्षेची तरतूद केलेली आहे. त्याअंतर्गत श्रीमती सुमय्या मुनीरअहमद बाणदार (रा.जयसिंगपूर) व ओंकार भीमराव कनेरकर (रा.सातवे) या वारसदारांना धनादेशांचे वाटप झाले. तसेच तुषार तुकाराम पाटील (रा.असंडोली), पूजा शितल उपाध्ये (रा.उमळवाड), सौरभ आबाजी एकशिंगे (रा.केनवडे), धनराज माधवराव रणनवरे (रा.कडगाव), अभिजित कुमार पाटील (रा.जयसिंगपूर), शाहरुख याकूब नदाफ (रा.कसबा सांगाव), ओंकार भीमराव कनेरकर (रा.सातवे) व श्रीमती सुमय्या मुनीरअहमद बाणदार (रा.जयसिंगपूर) या वारसदारांना अनुकंपा अंतर्गत बँकेच्या नोकरीच्या नियुक्ती पत्रांचेही वितरण झाले.
      यावेळी संचालक मंडळातील राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खा. श्रीमती निवेदिता माने, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, आ. राजूबाबा आवळे, अनिल पाटील, विलासराव गाताडे, आर. के. पोवार, पी. जी. शिंदे, सर्जेराव पाटील – पेरीडकर, अशोक चराटी, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, सौ. अर्चना आनंदराव पाटील, रणजीतसिंह पाटील आदी सदस्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *