केडीसीसी बँकेला १८० कोटींचा ढोबळ नफा

Spread the love


            
• अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल १८० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षाअखेरची ही आकडेवारी असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेच्या कोल्हापुरातील केंद्र कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. ढोबळ नफ्यातून अनुषंगिक तरतुदीच्या रक्कमा वजा जाता निव्वळ शिल्लक नफा ४४ कोटी रुपये होत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
       यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, सौ. स्मिता गवळी आदी संचालक तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक गोरख शिंदे, अकाउंट्स बँकिंगचे व्यवस्थापक विकास जगताप, सीएमए सेलचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, शासकीय लेखा परीक्षक सुनील नागावकर उपस्थित होते.
       ढोबळ नफ्यातून केलेल्या तरतुदी अशा-
• अपात्र कर्जमाफीवरील व्याज तरतूद: ११ कोटी, ८६ लाख.
• ३१  मार्च २०२२ अखेर सेविंग खाते व्याज: पाच कोटी, ८४ लाख.
• कर्मचारी बोनस: सात कोटी, ३६ लाख.
• रजेचा पगार: नऊ कोटी, २५ लाख.
• गुंतवणूक घसारा निधी: ८० लाख.
• स्पेशल रिझर्व फंड :एक कोटी.
• कॅपिटल रिझर्व फंड: दीड लाख.
• एनपीए प्रोव्हिजन: ८० कोटी, २१ लाख.
• स्टॅंडर्ड ॲसेट प्रोविजन:  तीन कोटी.
• ईडीएलआय (एम्प्लॉइज डिपॉझिट लींक इन्शुरन्स): ४६ लाख.
• वैयक्तिक अपघात विमा योजना: ९५ लाख.
• इन्कम टॅक्स: १५  कोटी, ३३  लाख.
• शिल्लक निव्वळ नफा : ४४ कोटी.
                            उद्दिष्टे २०२३ ची…..
      मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आर्थिक वर्ष २०२२ -२३ अखेर बँकेची पुढील उद्दिष्टे असल्याचे स्पष्ट केले.
● ठेवी : नऊ हजार कोटी.
● ढोबळ नफा : २०० कोटी.
● ढोबळ एनपीए : ३ टक्केचे आत.
● नक्त एनपीए प्रमाण : शून्य टक्के.
● शेअर वाढीचे उद्दिष्ट : दहा कोटी.
● सीआरएआर  प्रमाण : १२ टक्के.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!