खा.मंडलिक व चंद्रदीप नरके यांनी कळेसह धामणी खोऱ्यातील पूरग्रस्तभागाची केली पाहणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     पन्हाळा तालुक्यातील कळे, बाजारभोगाव बाजारपेठांमध्ये महापुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त दुकाने, व्यावसायिक तसेच पडझड झालेल्या घरांसह धामणी खोऱ्यातील भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या भागाची खासदार संजय मंडलिक व माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पाहणी करून त्यांच्या नुकसानभरपाईसाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
      कळे, बाजारभोगावमध्ये महापुरामुळे अनेक दुकानांचे झालेले नुकसान व धामणी खोऱ्यातील पणुत्रे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी व राधानगरी तालुक्यातील गवशी, पात्रेवाडी आदी गावांमध्ये पुरामुळे व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीप्रसंगी त्यांनी पूरग्रस्त व्यावसायिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महसूल विभागाला पूरग्रस्त दुकाने, व्यवसाय, धंदे, पडझड झालेली घरे व शेतीच्या नुकसानीचे योग्य पद्धतीने पंचनामे करून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. महापुरामध्ये जागोजागी विद्युततारा तुटून वीजखांब व ट्रान्सफार्मर कोसळले तातडीने त्याचे पंचनामे करून ते पूर्ववत करण्याच्या सूचनाही यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
      यावेळी जि. प. सदस्य सर्जेराव पाटील, पं. स. सदस्य रवींद्र चौगले, कुंभीचे संचालक संजय ब. पाटील, आबा रामा पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सर्जेराव मोळे, कळेचे सरपंच सुभाष पाटील, काटेभोगावचे सरपंच रवींद्र पाटील, प्रधान पाटील, सरदार द. पाटील, वसंत पाटील, विठ्ठल पाटील, अरुण पाटील, शूरसेन पाटील, संदीप पाटील, प्रल्हाद पाटील यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते, दुकानदार व शेतकरी उपस्थित होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!