किरणोत्सवात सूर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत


कोल्हापूर • प्रतिनिधी
   करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी मंदिरात आज किरणोत्सवात सूर्यकिरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली. सूर्यकिरणे लुप्त झाल्यानंतर देवीची आरती झाली.
    दरम्यान. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद असल्याने त्यांना प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित राहून किरणोत्सव सोहळा पाहता आला नाही.
     श्री अंबाबाई मंदिरात वर्षांतून दोन वेळा किरणोत्सव सोहळा होतो. यापूर्वी  सलग तीन दिवस होत असलेला हा सोहळा गेले दोन वर्षे पाच दिवसांचा होत आहे. पहिल्या दिवशी किरणे देवीच्या चरणांवर, दुसऱ्या दिवशी कमरेवर आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलावर पोहचून किरणोत्सव पूर्ण होतो.
     रविवारी ढगाळ हवामानामुळे किरणोत्सव झाला नाही. सोमवारी मात्र किरणोत्सव झाला. यामध्ये मावळतीला चाललेली सूर्यकिरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली. पश्र्चिमेला असलेल्या महाद्वारातून सूर्यकिरणांनी सायंकाळी पाच वाजून अकरा मिनिटांनी मंदिरात प्रवेश केला.त्यानंतर टप्प्याटप्याने किरणे देवीच्या चरणांवर पोहोचली. त्यानंतर पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी किरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली आणि डाव्या बाजूला लुप्त झाली. त्यानंतर देवीची आरती झाली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *