कोल्हापूर • प्रतिनिधी
सन १४ एप्रिल १९४४ यादिवशी एस.एस. फोर्ट स्टिकींग जाहजला व्हिक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भीषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे ६६ जवान शहीद झाले. त्यांच्या बलिदानाबद्ल हा दिवस अग्निशमन सेवा दिन व सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो.
कोल्हापूर महापालिकेच्यावतीने बुधवारी अग्निशमन सेवा दिनानिमित्त कावळानाका येथील ताराराणी फायर स्टेशन येथे अग्निशमन सेवा बजावत असताना प्राणाची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या कार्यक्रमात फायर गीत, श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी मनिष रणबीसे, दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी उपस्थित होते