पंचगंगा स्मशानभूमी व आयसोलेशन हॉस्पीटलला प्रशासकांची भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     पंचगंगा स्मशानभूमी तसेच आयसोलेशन हॉस्पीटलला प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी भेट दिली.
      यावेळी प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांनी स्मशानभूमी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामावर हजर झाल्यानंतर व काम संपलेनंतर थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सीजन टेस्ट करण्याच्या सुचना दिल्या. त्याचप्रमाणे कोवीड मृत रुग्णांचे दहन करण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे व कर्मचारी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर याठिकाणी शेणीचा, लाकडाचा व गॅसचा साठा पुरेसा असल्याबाबतचा आढावा घेतला.
      यानंतर प्रशासक डॉ. बलवकडे यांनी आयसोलेशन हॉस्पीटल येथे भेट देऊन पाहणी केली. नागरीकांची स्वॅब घेण्यासाठी गर्दी होत असल्याने नियमांचे पालन करुन त्यांचे स्वॅब घ्या. याठिकाणी नागरीक उन्हामध्ये उभे राहत असल्याने त्यांना मांडव घालून सावलीची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या. जास्तीत जास्त नागरीकांचे स्वॅब घ्या. लसीकरण वाढवा अशा सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे यांनी  वैद्यकिय अधिकारी डॉ.रमेश जाधव यांना दिल्या.
     आयसोलेशन हॉस्पीटल येथे शहराबरोबरच ग्रामीण भागातीलही नागरीक टेस्टींगसाठी येतात. परंतु हे नागरीक याठिकाणी येताना रिक्षाने अथवा एसटी बसने याठिकाणी येतात. यामध्ये एखादा पॉझिटिव्ह नागरीक असल्यास त्यांच्या प्रवासातून इतर लोकांना संक्रमण होण्याचा धोका आहे. त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या जवळच असणाऱ्या स्वॅब तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी करावी.  जेणेकरुन संक्रमणचा धोका टळून आपले शहर कसे सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!