कोल्हापूर • प्रतिनिधी
रेल्वे विभाग, समाज कल्याण कार्यालय, विभागीय वन कार्यालय, आय.टी. पार्क यांचे थकबाकी पोटी पाणी कनेकशन महापालिकेकडून खंडीत करण्यात आले आहे.
शहरातील रेल्वे विभाग, समाज कल्याण कार्यालय, विभागीय वन कार्यालय या शासकीय कार्यालयाकडील लाखो रुपये थकबाकी भरणा न केलेने त्यांची नळ कनेक्शन बुधवारी ( दि.२७) खंडीत करण्यात आली. आय.टी. पार्कची थकबाकी असल्याने सोमवारी (दि.२५) त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे.
महापालिका पाणी पुरवठा विभागाच्यावतीने पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिम सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत आज रेल्वे विभागाकडील चार कनेक्शन, समाज कल्याण कार्यालयाचे एक कनेकशन, विभागीय वन कार्यालय यांचे एक कनेक्शन, आय.टी. पार्क यांचे एक कनेकशन खंडीत करण्यात आले.
याप्रमाणे इतर शासकीय कार्यालयाकडील थकबाकी आहे. यामध्ये सी.पी.आर.कार्यालय , बारा ग्रामपंचायती, रेल्वे विभाग , पाटबंधारे, वारणा विभाग, सार्व.बांधकाम कार्यालय, शिवाजी विद्यापीठ कार्यालय, पाटबंधारे पंचगंगा, जिल्हाधिकारी कार्यालय, सी.पी.आर.अधिष्ठाता, जिल्हा परिषद कार्यालय, टेलिफोन विभाग यांचा समावेश आहे. या शासकीय कार्यालये व अन्य शासकीय कार्यालयाकडील सुमारे रु.२१.०४ कोटी थकबाकी आहे.
ही थकीत रक्कम त्वरीत भरणेबाबत पाणी पुरवठा कार्यालयाकडून यापूर्वी वारंवार लेखी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तसेच यापुर्वी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचेमार्फत संबंधित विभाग प्रमुखांना अर्धशासकीय पत्र देण्यात आले आहे. यामध्ये संबंधीत कार्यालयांनी थकीत रक्कम भरणा करण्यात यावी अन्यथा पाणी कनेक्शन खंडीत करण्यात येईल असे लेखी कळविण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त जल अभियंता नारायण भोसले यांनी संबंधित विभागप्रमुख यांची समक्ष भेट घेऊन थकीत रक्कम भरणेबाबत विनंती केली आहे. परंतु संबंधित कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने या शासकीय कार्यालयाकडील नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
आजची कारवाई प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता नारायण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये वसुली पथकप्रमुख मोहन जाधव, मिटर रिडर रमेश मगदूम, फिटर तानाजी माजगांवकर, वसंत ढेरे यांनी भाग घेतला