कोल्हापूर महापालिकेकडून पाणीपुरवठा, पथदिवे वीज बिल थकबाकी शून्य

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महावितरणच्या  वीजबिलाचा नियमित भरणा करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेने पथदिव्याचे वीज बिल ४ कोटी ५० लक्ष रूपये व पाणीपुरवठ्याचे ५२ लक्ष रूपये भरणा केला आहे. मार्चअखेर २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोल्हापूर महापालिकेने वीजबिलाची थकबाकी शून्य केली आहे.
     दरम्यान, महावितरणच्या कोडोली उपविभागातील चावरे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याचे ३ लक्ष ७१ हजार रूपयांचे वीज बिल भरले आहे. उपविभागीय अभियंता विनोद माने हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत  वीज बिलाच्या थकबाकी वसूलीसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. कोडोली उपविभाग थकबाकीमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!