महापालिका पथकाकडून १० दुकानांवर व १८१ लोकांवर करवाई : ३५ हजार रुपये दंड वसूल

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून १० दुकानांवर व १८१ लोकांकडून ३५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
      कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज  वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून १० दुकानांवर व १८१ लोकांकडून ३५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
       यामध्ये  सोमवारी (दि.२२)  महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाने १० दुकानदारांच्यावर ५ हजार रुपये, थूंकने व धुम्रपान केल्याबददल १० व्यक्तींवर कारवाई करुन २००० रुपये  दंड व विनामास्क फिरणाऱ्यां १८१ नागरीकांकडून १८ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.  तसेच प्लॅस्टिक वापरल्याबददल दोन दुकानदारांच्याकडून रुपये १० हजार दंड वसूल करण्यात आला.
      शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन करुन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Other symptoms Chlamydial infection of the rectum called proctitis is possible through having anal sex with someone who has the infection. cialis tablets Complications Women with untreated chlamydia are at risk of complications such as: pelvic inflammatory disease PID , in which the reproductive organs in the pelvis become inflamed; chronic pelvic pain; ectopic pregnancy in which a pregnancy develops outside the uterus, such as in the fallopian tubes ; and infertility or difficulty getting pregnant, due to infection and scarring of the fallopian tubes.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!