महापालिका पथकाकडून २०१ लोकांवर कारवाई: ३४ हजार दंड वसूल


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून २०१ लोकांकडून ३४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
     कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून २०१ लोकांकडून ३४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल मंगळवारी (दि.१३)  महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क १८४ लोकांनकडून १८४००, सोशल डिस्टन्स ६ लोकांकडून ४०००, सार्वजनिक ठिकाणी थुंकलेबाबत ९ लोकांनकडून १८०० व प्लॅस्टिकचा वापर केलेल्या २ व्यक्तिकडून १०००० असे एकूण २०१ लोकांकडून ३४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
     शहरामध्ये गर्दी वाढत असलेने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन करुन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *