कोल्हापूर • प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स व पल्लवी प्रीतम शहा यांच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, अग्निशमन दल, शववाहिका व रुग्णवाहिका येथे सेवा देणाऱ्या १५० कर्मचाऱ्यांचा कोविड विमा उतरवण्यात आला. हा कोविड विमा एक वर्ष कालावधीचा आहे.
यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलच्या बिलापोटी ५० हजार रुपये मिळणार आहेत. त्याचा फायदा कर्मचारी व व्यक्तिगत त्यांच्या कुटुंबियांसाठी होणार आहे. शनिवारी या विमा पॉलिसीच्या फाईल संबंधित कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आल्या.
यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, महापालिका उपायुक्त रवीकांत आडसुळ, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष अनिकेत अष्टेकर, डॉ. प्रीतम शहा, पल्लवी शहा, सचिन लाड, महानगरपालिका मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, रोट्रॅक्ट मिडटाऊन फिनिक्स अध्यक्ष निखिल कोळी आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. पल्लवी प्रीतम शहा यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले, त्याबद्दल मिडटाऊन परिवारातर्फे सौ. पल्लवी शहा व डॉ. प्रीतम शहा यांचे आभार मानले