कोल्हापूर चेंबरतर्फे नागरी आरोग्य केंद्र व आयसोलेशन हॉस्पीटलला फॅन भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने युध्दपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याबाबत कोल्हापुरातील उद्योगपती, सामाजिक संस्था व नागरिकांना महापालिकेस वस्तू स्वरुपात मागील वर्षाप्रमाणे यंदाही मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिजच्यावतीने महापालिकेच्या ११ नागरी आरोग्य केंद्र व आयसोलेशन हॉस्पीटल येथे लसीकरणासाठी व स्वॅबसाठी येणाऱ्या नागरिकांना थंड हवा मिळणेसाठी १२ टेबल फॅन उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्याचप्रमाणे लसीकरण झाल्यानंतर अथवा लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय या असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
      सदरचे साहित्य महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे व पदाधिकारी यांनी दिले. यावेळी असोसिएशनने महापालिकेस इतर कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता आहे ते उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त निखील मोरे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिजचे उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, संचालक वैभव सावर्डेकर, हरिभाई पटेल, अजित कोठारी, प्रशांत शिंदे, राहूल नष्टे, संपत पाटील, विजय नारायणपुरे, प्रसन्न शिंदे आदी उपस्थित होते.
             मदतीचे आवाहन…..
      कोल्हापुरातील उद्योगपती, सामाजिक संस्था व नागरिकांनी महानगरपालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी लागणारी औषधे (Tab Vit C 500mg, Tab Zinc 500mg, Cap Doxycycline 100mg, Tab Ivermectine 12 mg, Vitamins D sachet (60000 IU), Tab Fabiflu 200mg, Tab Azithromycin 500mg, Cap Omeprazole 20mg, Tab paracetamol 500mg, Tab CPM 4mg, Oxygen masks adult and pead, Multi vitamin tablets) व सर्जिकल ग्लोज, एन९५ मास्क, सॅनिटाईजर याप्रमाणे वस्तू स्वरुपात मदत करावी. तसेच ज्या कोणाला रोख रक्कम द्यावयाची आहे त्यांनी उप-आयुक्त निखिल मोरे यांच्या ९७६६५३२०१९ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!