कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर चर्च कौन्सिलच्यावतीने ऑल सेंट्स दिनाचे औचित्य साधत, आज मेरी वान्लेस हॉस्पिटलमध्ये किडनी विकारावरील शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.
सुप्रसिद्ध किडनी रोग तज्ञ डॉ. युवराज सावंत यांनी रुग्णांची तपासणी केली. किडनी विकाराशी निगडीत असणाऱ्या अनेक व्याधींवर यावेळी तज्ञांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले व त्यानंतर रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये लाभ घेतलेल्या रुग्णांना रक्त – लघवी तपासणीसाठी सिद्धिविनायक रिसर्च सेंटरद्वारे भरघोस सवलत देण्यात आली.
यावेळी डॉ.संजय देसाई यांनी शिबिरासंदर्भात मार्गदर्शन केले. सिद्धिविनायक नर्सिंग होमचे समन्वयक योगीराज साखरे यांनी नियोजन केले.या शिबिरासाठी कोल्हापूर चर्च कौन्सिलचे सेक्रेटरी रेव्ह. जग्गनाथ हिरवे, रेव्ह. रमेश मोहिते, अॅड. डॅनिएल धनवडे, दिनानाथ कदम, उदय बिजापुरकर,समसोन समुद्रे, डॉ.अर्पणा तिवडे, राजेंद्र रणभिसे, रवींद्र रणभिसे, सुलभा जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.