कोल्हापूर जिल्ह्याला ऑक्सीजनसह रेमडीसिव्हीर इंजेक्शनचाही वाढीव पुरवठा: मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजपासूनच ऑक्‍सिजनसह रेमडीसिव्हीवर इंजेक्शनचाही वाढीव पुरवठा सुरू झालेला आहे, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये श्री. मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.
      मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपायोजना करण्यासाठी परवाच आपण स्वतः व पालकमंत्री सतेज पाटील मुंबईला गेलो होतो. ऑक्सीजन व रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्यासाठी त्याठिकाणी पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून आज जवळपास तिप्पट – चौपट इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर १५ टन ऑक्सीजन वाढवून मिळालेला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बेड उपलब्ध आहेत.
     कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून आठवड्याभरात हे सर्व आटोक्यात येईल. याआधी जिल्ह्याला दररोज सरसकट ३० टन ऑक्सिजन पुरवठा होत होता. तो वाढून उद्यापासून सरासरी ४५ टन आणि त्याहून अधिक ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल. तसेच, याआधी जिल्ह्याला दररोज सरासरी अडीचशे ते तीनशे इंजेक्शन मिळत होती. रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा व्यवस्थित सुरू झालेला असून आजच अडीच हजाराहून अधिक  इंजेक्शन पुरवठा झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!