कोल्हापूर • प्रतिनिधी
राष्ट्रवादी भवन, श्री शाहू मार्केटयार्ड, कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
१० जून १९९९ रोजी माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. त्यास २२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने आज सकाळी १०:१० वाजता श्री शाहू मार्केट यार्ड येथील पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, गोकुळचे संचालक किसनराव चौगुले, शिरोळ नगपालिकेचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला जिल्हा उपाध्यक्षा स्वाती मोरे यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते जीवन संजिवनी बुटी या कोरोना जीवरक्षक औषधाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना वाटप करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य दिंडी सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते गोकुळ दूध संघ संचालकपदी निवड झाल्याबद्दल किसनराव चौगुले, शिरोळ नगरपालिका नगराध्यक्षपदी निवड झालेबद्दल अमरसिंह माने पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निहाल कलावंत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब देशमुख, यासिन मुजावर, हरिश्चंद्र पाटील, बाळासाहेब खैरे, रोहित पाटील, ए.व्ही. आरळेकर, अनिरूद्ध गाडवी, संतोष मेंगाणे, रामराव इंगळे, मधुकर जांभळे, शिवानंद माळी, संभाजी पवार, डी. बी पिष्ठे, श्वेता बडोदेकर, स्नेहल मठपती, अस्मिता पवार, स्वाती मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.