कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतचा स्मॅकच्यावतीने सत्कार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     अर्जुन पुरस्कार प्राप्त कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिने ऐतिहासिक कामगिरी करत क्रोएशियामध्ये झालेल्या ISSF नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत दोन सुवर्ण व एक कांस्य पदक पटकावल्याबद्दल शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर (स्मॅक) च्यावतीने अध्यक्ष अतुल पाटील यांचे हस्ते स्मॅक भवन येथे सत्कार करण्यात आला.  छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
     यावेळी समारंभाचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी राही सरनोबतने नेमबाजीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या पदकांचा आढावा घेतला.
     सत्काराला उत्तर देताना राहीने नेमबाजीमधील तिचा प्रवास विशद केला.
टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील अनुभव मला नक्कीच २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उपयोगी पडणार आहे, असा आत्मविश्वास व्यक्त करत आगामी काळात २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला लागणार असून, सराव करून नक्कीच देशासाठी पदक जिंकेन, असा निर्धार राही सरनोबतने व्यक्त केला.
     यावेळी दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौउंड्रीमेन कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी  रविंद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचासुद्धा स्मॅकचे उपाध्यक्ष दिपक पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.  
      या समारंभास स्मॅकचे  ट्रेझरर एम. वाय. पाटील, आयटीआय चेअरमन राजू पाटील, कोल्हापूर फाउंड्री प्लास्टर चेअरमन सचिन पाटील, सेमिनार कमिटी चेअरमन अमर जाधव, संचालक प्रशांत शेळके, जयदत्त जोशीलकर, स्वीकृत संचालक सोहन  शिरगांवकर, निमंत्रीत सदस्य बी. एम. सोमैया, नामदेव पाटील, शेखर कुसाळे, बदाम पाटील, रोहित मेनन, अजिंक्य सरनोबत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!