कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक: १५ उमेदवार निवडणूक रिंगणात

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका) 
        कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी २ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.
        कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यापैकी आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (अपक्ष) या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
            मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राजकीय पक्षाचे उमेदवार…..
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नाव व चिन्ह याप्रमाणे-
• जाधव जयश्री चंद्रकांत (आण्णा) – हात  
• सत्यजीत (नाना) कदम – कमळ
             नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार (मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य राजकीय पक्षा व्यतिरिक्त)…..
• यशवंत कृष्णा शेळके – कप आणि बशी.
• विजय शामराव केसरकर – ॲटो रिक्षा.
• शाहीद शहाजान शेख – गॅस सिलेंडर.
                              इतर उमेदवार…..
• देसाई सुभाष वैजू – रोड रोलर.
• बाजीराव सदाशिव नाईक- एअरकंडिशनर
• भोसले भारत संभाजी – कपाट.
• मनिषा मनोहर कारंडे – दूरदर्शन.
• माने अरविंद भिवा – कॅरम बोर्ड.
• मुस्ताक अजीज मुल्ला – हेलिकॉप्टर.
• मुंडे करुणा धनंजय – शिवण यंत्र.
•राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक – किटली
• राजेश सदाशिव कांबळे – शिट्टी
• संजय भिकाजी मागाडे – सफरचंद
————————————————

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!