कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: १४ उमेदवारांनी दाखल केले १६ नामनिर्देशनपत्र

Spread the love

• एकूण १९ उमेदवारांचे २७ नामनिर्देशनपत्र दाखल
कोल्हापूर • (जिमाका) 
       कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी १४ उमेदवारांनी १६ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. गुरुवारी जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सचिन प्रल्हाद चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष), करुणा धनजंय मुंडे (अपक्ष), संजय भिकाजी मागाडे (अपक्ष), अरविंद भिवा माने (अपक्ष), भारत संभाजी भोसले (अपक्ष), शाहीद शहाजान शेख (अपक्ष), सत्यजित (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी), मुस्ताक अजीज मुल्ला (अपक्ष), सुभाष वैजु देसाई (अपक्ष), आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष), मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष) व राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
       आजपर्यंत एकूण १९ उमेदवारांची २७  नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!