कोल्हापूर, सांगलीत वीज बिलाची ६६५ कोटी रूपयांची थकबाकी


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ९ लक्ष ६० हजार ग्राहकांकडे वीज बिलाची ६६५ कोटी रूपयांची थकबाकी झाली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी नुकतीच कोल्हापूर परिमंडळाची आढावा बैठक घेतली.
      या बैठकीत वीजग्राहकांशी संपर्क साधून थकबाकी भरण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सुचना श्री.नाळे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. सदरच्या आढावा बैठकीस मुख्य अभियंता (प्र.) अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्यासह विभाग, उपविभाग व शाखास्तरावरील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
     कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत घरगुती ८ लक्ष २४ हजार ग्राहकांकडे सर्वाधिक २२९ कोटी ७२ लक्ष रूपये , वाणिज्य ८७ हजार ८२२ ग्राहक- ५६ कोटी ६२ लक्ष रूपये , औद्योगिक २७ हजार १६१ ग्राहक-९१ कोटी ५६ लक्ष रूपये , पथदिवे ५ हजार ८२० ग्राहक –१६६ कोटी ६५ लक्ष रूपये , पाणीपुरवठा ४ हजार १० ग्राहक- १०९ कोटी ३७ लक्ष रूपये, सार्वजनिक सेवा ७ हजार ३३ ग्राहक -६ कोटी १० लक्ष रूपये वीज बिलाची थकबाकी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३ लक्ष ८४ हजार ग्राहकांकडे २६१ कोटी ५८ लक्ष रूपये तर सांगली जिल्ह्यात ५ लक्ष ७६ हजार ग्राहकांकडे ४०३ कोटी ३२ लक्ष रूपये वीज बिल थकबाकी आहे.
      कोरोना, तौक्ते चक्रीवादळासारख्या आपत्तीशी सामना करीत वीजग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजसेवा देण्यासाठी महावितरणची यंत्रणा अविश्रांतपणे राबते आहे. येत्या मान्सून काळात अखंडित वीजसेवेसाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र वीज बिले थकल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. वीजसेवेचा दैनंदिन कारभार सुरळीत चालण्यासाठी वीजग्राहकांचे सहकार्य महत्वाचे आहे. तेंव्हा वीजग्राहकांनी थकीत व चालू वीज बिल भरून महावितरणला आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन केले आहे.
     वीजग्राहकांना महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रावर वीज बिले भरण्याची सोय आहे. घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने महावितरण मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in या अधिकृत संकेस्थळावर वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांचे वीजबिल १० हजार रूपयांपेक्षा अधिक असल्यास आरटीजिएस/ एनईएफटीव्दारे वीज बिल भरण्याकरीता वीजबिलावर महावितरण बँक खात्याचा तपशील दिलेला आहे.
———————————————– ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *