खोटं बोल पण रेटून बोल या भाजपच्या प्रवृत्तीला कोल्हापूरकर थारा देणार नाहीत: विजय देवणे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      खोटं बोल पण रेटून बोल या भाजपच्या प्रवृत्तीला कोल्हापूर उत्तरमधील जनता थारा देणार नाहीत. जयश्री जाधव यांच्या विजयासाठी आघाडीचे सर्व नेते एकत्र आले असून त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ पदयात्रेप्रसंगी ते बोलत होते.
       मंगळवार पेठेतील लाड चौक, हैदर गल्ली फिरंगाई तालीम, हिंद मंडळ मार्गे ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आण्णांच्या कामाची पोहोचपावती जनता विजयाच्या रूपाने मला देईल अशा विश्वास जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.
       सर्वसामान्य जनतेमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या आण्णांनी सर्वांना आपले केले होते. आण्णांचे विकासकार्य ताकदीने पुढे नेण्यासाठी जयश्री वहिनींना संधी द्यावी असे आवाहन  कॉग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले.
        माजी महापौर सागर चव्हाण, जयश्री चव्हाण, रणजित माने, ॲङ. कल्याणी माणगावे, प्रशांत जगदाळे, निखिल जाधव, अमर जरग, चेतन मोहिते, अरुण हेरवाडकर दिलीप वायदंडे, करण सकटे, अर्जुन सकटे, विनय बारवसे, प्रकाश दुकांडे, माणिक खांडेकर, लक्ष्मण पवार, कपिल सकटे, रामदास भाले, जितेंद्र सावंत, युवराज साळोखे, प्रशांत जगदाळे, रवी आवळे, अशोक मिस्त्री, स्वप्नील कांबळे, सतीश पाटील, पिल्लू जगदाळे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!