युट्यूबच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेतून कृष्णराज महाडिक यांची नाभिक समाजाला मदत


कोल्हापूर • प्रतिनिधी
     युट्यूबच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेतून वंचित, कष्टकरी आणि गरजू लोकांचे अश्रू पुसण्याचा आपला नेहमीच प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हयातील नाभिक समाजबांधवांना आपण मदत करत आहे. समाजातील विविध कष्टकरी, गरजू वर्गाला याहीपुढे सातत्याने मदत केली जाईल, अशी ग्वाही कृष्णराज महाडिक यांनी दिली. युट्यूबच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेतून महाडिक यांनी, जिल्हयातील दीडशेहून अधिक सलून व्यावसायिकांना अन्नधान्य आणि रेशन कीटचे वाटप केले, याप्रसंगी ते बोलत होते.
     कृष्णराज महाडिक हे आपल्या कुटुंबातील विविध प्रसंगावर, तसेच विविध सामाजिक घटनांवर व्हिडिओ क्लीप बनवून, व्ल्हॉगद्वारे युटयूबवर व्हायरल करत असतात. त्यांच्या क्लिपना मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळतात. युट्यूबवर त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यातून त्यांना युट्यूबकडून काही रक्कम दिली जाते. ही रक्कम गोरगरीबांसाठी खर्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार कॉलेज तरूण-तरूणींसाठी दुचाकी जिंकण्याची स्पर्धा, रिक्षावाल्यांना विमा असे अनेकविध उपक्रम त्यांनी यापूर्वी राबवले. आजच्या त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, त्यांनी मुंबई-पुणे आणि कोल्हापूरमध्ये नाभिक बांधवांना मदतीचा उपक्रम राबवला. कोल्हापुरात नाभिक बांधवांचा मेळावा झाला. मेळाव्यामध्ये नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार, चंद्रकांत संकपाळ, संतोष चव्हाण, विश्‍वास गंगधर, सरदार झेंडे हे पदाधिकारी उपस्थित होते.
     युट्यूबच्या माध्यमातून मिळणार्‍या रकमेबाबत कृष्णराज महाडिक यांनी माहिती दिली. त्यानंतर दीडशेहून अधिक सलून व्यावसायिकांना रेशन कीटचं वाटप करण्यात आले. भविष्यातही समाजातील विविध घटकांसाठी मदतीचा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी नमुद केले. या उपक्रमावेळी पिंटू संकपाळ, मनोज टिपुगडे, बाळासाहेब साळुंखे, संपत मर्दाने यांच्यासह नाभिक संघटनांचे पदाधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते.  
———————————————– Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *