कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांची केडीसीसी बँकेला अभ्यास भेट


कोल्हापूर • प्रतिनिधी
    राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (केडीसीसी) अभ्यासपर भेट दिली.
    बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून त्यांनी बँकेविषयी माहिती घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी बँकेच्या कामकाजाची सविस्तर माहिती यावेळी दिली.
    ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या पदवीच्या चौथ्या वर्षाच्या कृषिकन्यामध्ये साक्षी राजेंद्र कदम, पुजा गणपती येजरे, सोनिया शशिकांत व्हटकर, नेहा राहुल शिंदे,आरती राजाराम ढेंगे, सोनाली शिवाजी सावंत आदींचा समावेश होता.
      उपक्रमामध्ये कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. एन. रसाळ, समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे, कार्यक्रम अधिकारी एस. डी. वाळे,  प्रा. सी. व्ही. मेमाने, डॉ. एच. आर. शिंदे, डॉ. एस. जे. वाघमारे, डॉ. आर. आर. हसुरे, डॉ. डी. के. खटमळे यांचे मार्गदर्शन झाले.यावेळी संचालक प्रताप उर्फ भैय्या माने,बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, श्रीमती उदयानीदेवी साळुंखे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
…………………………………………..
       शेतकऱ्यांची वरदायिनी बँक
    कृषी विषयाची पदवी शिकत असताना कृषी क्षेत्रातील विविध उपक्रम आणि योजनांचा आपण अभ्यास करीत असल्याचे यावेळी कृषिकन्यानी सांगितले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी केडीसीसी बँक नेहमीच अग्रेसर राहिल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *