फुटबॉल हंगामासाठी केएसएच्यावतीने खेळाडू नोंदणीसाठी मुदतवाढ

Spread the love

• यंदाच्या हंगामासाठी फक्त जिल्ह्यातील खेळाडूंची नोंदणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     सन २०२१-२२च्या फुटबॉल हंगामासाठी केएसएच्यावतीने फुटबॉल खेळाडू नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. संघात फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंचीच नोंदणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
     कोल्हापूर स्पोर्ट्स्‌ असोसिएशन आणि केएसए वरिष्ठ गटातील (ए डिव्हीजन) संघ प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक केएसए अध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.६) झाली. या बैठकीत सुरूवातीला संघांच्या प्रतिनिधींनी  केएसएने दिलेल्या खेळाडू नोंदणी कालावधीमध्ये मुदतवाढ मिळावी व संघाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून लिग व बाद पद्धतीचे सामने घ्यावेत असे सूचविले.
      या विषयावर सखोल चर्चा होऊन एकमताने निर्णय घेणेत आले. ते पुढीलप्रमाणे:
• चालू वर्षी कोविड-१९ व ओमायक्रॉन व्हेरीएंट यांच्या पार्श्र्वभूमीवर सर्व संघात फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंचीच नोंदणी करण्याचे निश्चित करण्यात आले.   
• या नियमाची अंमलबजावणी फक्त चालू फुटबॉल हंगामासाठी आहे.
• नव्याने खेळाडू नोंदणी २० ते २३  जानेवारी २०२२ नियमित तर २४ व २५ जानेवारीला विलंब नोंदणी होईल.
• नोंदणी वेळ सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत (खेळाडू नोंदणी कागदपत्रांची पडताळणी)
     छत्रपती शाहू स्टेडियम येथे केएसए अध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस केएसए ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉ.जनरल सेक्रेटरी राजेंद दळवी, ऑन. फुटबॉल सेक्रेटरी अमर सासने व कार्यकारिणी सदस्य संभाजीराव पाटील-मांगोरे, मनोज जाधव, विश्र्वंभर मालेकर-कांबळे, दिपक राऊत, दिपक घोडके व सर्व संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!